गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्षाची सुरुवात ! हा दिवस नव्या संकल्पांचा, सकारात्मक उर्जेचा आणि शुभारंभाचा प्रतीक आहे. गुढीपाडवा शुभ मुहूर्त असल्याने गुंतवणुकीसाठी आणि प्रॉपर्टी डिलिंगसाठी अनुकूल असतो. दीर्घकालीन लाभाच्या दृष्टीने मालमत्तेत गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ असल्याने हा गुढीपाडवा ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे !

गुढीपाडवा घर खरेदीसाठी शुभ मानला जातो

गुढीपाडव्याला ग्राहकांचा नवनवीन गोष्टी खरेदी करण्याकडे कल असतो. कारण, वास्तुशास्त्रानुसार नवीन घरात प्रवेश करण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे. या दिवशी घेतलेल्या गोष्टींमध्ये वाढ होते, त्यामुळे घर खरेदी ही समृद्धीचे प्रतीक ठरते आणि आर्थिक समृद्धी होते. या मंगलदिनी घर खरेदी करा आणि बी. जे कन्स्ट्रक्शन्स सोबत या नववर्षात तुमच्या कुटुंबासाठी नवीन घराचे दार उघडा !

शुभ मुहूर्तावर बँका, हाऊसिंग फायनान्स कंपन्या विशेष ऑफर्स देतात

ग्राहकांकडून घर खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने बँका, हाऊसिंग फायनान्स कंपन्याकडून सणासुदीच्या काळात गृहकर्जावर कमी व्याजदर आणि सवलती मिळण्याची शक्यता असते. अशा संस्था गृहकर्जावरील व्याजदरातसुद्धा कपात करतात. काही वेळा, हा व्याजदर मर्यादित काळासाठी असतो. काही ठिकाणी गृहकर्जासाठी डाउन पेमेंट (मार्जिन मनी) कमी लागतो, ज्यामुळे घर खरेदी अधिक सोपे होते.

काही बँका कर्ज फेडण्याचे अधिक लवचिक पर्याय देतात, जसे की, प्रारंभी काही वर्षे फक्त व्याज भरायचे आणि नंतर हप्ते सुरू करायचे. काही वित्तीय संस्था गृहकर्ज घेणाऱ्यांना कॅशबॅक, गोल्ड कॉइन्स किंवा इतर गिफ्ट व्हाउचर देतात. जर तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत असाल, तर गुढीपाडवा हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे तुम्हाला उत्तम डील्स मिळू शकतात आणि तुमचे गृहस्वप्न सहज साकार होऊ शकते.

बी. जे कन्स्ट्रक्शन्स आणि विश्वासू ग्राहकसेवेचा समृद्ध वारसा

रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये बी. जे कन्स्ट्रक्शन्सला सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवेची परंपरा लाभली आहे. ग्राहकांना किफायतशीर आणि परवडणारी घरे देऊन, ग्राहक सेवेचा समृद्ध वारसा जपला आहे. यामुळेच ६ पेक्षा जास्त गृहनिर्माण प्रकल्प बी. जे कन्स्ट्रक्शन्सने यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. अत्याधुनिक आर्किटेक्चर, जबरदस्त इंटेरियर, बदलत्या जीवनशैलीचा विचार करत सर्व सुविधा उपलब्ध आहे.

१ सदाबाग या गृहनिर्माण प्रकल्पात महत्त्वाच्या भागांशी सहज कनेक्टिव्हिटी निर्माण होईल याची दक्षता घेण्यात आली आहे ! यामुळेच ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात आम्हाला यश आले आहे. या भव्य प्रकल्पात २ बीएचके रो हाऊस, ३ बीएचके स्वतंत्र बंगलो, ३ बीएचके ट्विन बंगल्यांपर्यंत तसेच NA प्लॉट्सपर्यंत विविध निवास पर्याय उपलब्ध आहेत, जे ग्राहकांच्या गरजेनुसार तयार करण्यात आले आहेत.

गुढीपाडवा हा नवीन सुरुवातीचा दिवस आहे. जर तुम्ही नवीन घर किंवा प्रॉपर्टी घेण्याचा विचार करत असाल, तर हा उत्तम मुहूर्त आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि तुमचे घराचे स्वप्न साकार करा ! आमच्या प्रकल्पांमध्ये तुम्हाला अत्याधुनिक सुविधा, उत्तम दर्जा, आणि सुरक्षित परिसर मिळतो. तुमच्या बजेटनुसार येथे अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नवीन घर, नवीन स्वप्ने, आणि नव्या संधींसह या गुढीपाडव्याला तुमच्या कुटुंबासाठी एक सुंदर भेट द्या !

गुढीपाडव्याच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला बी. जे कन्स्ट्रक्शन्स तर्फे हार्दिक शुभेच्छा !

Share: