नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत केलेली प्रत्येक खरेदी समृद्धी आणि आनंदाचे स्वागत करते. म्हणूनच, जर तुम्ही नवीन घर किंवा मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर नवरात्रापेक्षा शुभ काळ दुसरा नाही. या काळात घेतलेली गुंतवणूक तुमच्या जीवनात यश, स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येते.

घर खरेदी करणे हा आर्थिक निर्णय नसतो, तर तो आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या भावनांशी, सुरक्षिततेशी आणि भविष्यातील समृद्धीशी निगडित असतो. त्यामुळेच बहुतांश लोक घर खरेदीसाठी शुभ दिवस आणि शुभ मुहूर्त शोधतात.

नवरात्री या देवीच्या उपासनेचे पर्व असून नव्या सुरुवातीसाठी आदर्श काळ मानली जाते. या नऊ दिवसांमध्ये केलेले प्रत्येक नवीन काम, खरेदी किंवा गुंतवणूक अधिक चिरस्थायी आणि यशस्वी ठरते, असा आपल्या परंपरेत विश्वास आहे.

नवरात्रीत घर खरेदी का करावी ?

  • नवरात्रीत घर खरेदी केल्यास ते घर आनंद, शांतता आणि सकारात्मक उर्जेने भरलेले राहते असे मानले जाते.
  • देवी लक्ष्मीच्या कृपेशी निगडित असल्याने या काळात खरेदी केलेली मालमत्ता ही आर्थिक स्थैर्य व भरभराट दर्शवते.
  • नवरात्रीच्या निमित्ताने बँका, बिल्डर्स आणि डेव्हलपर्स खास ऑफर्स, सवलती आणि सणासुदीच्या योजना आणतात.
  • बँका आणि वित्तीय संस्था होमलोनवर आकर्षक व्याजदर देतात.

घर खरेदी करताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी !

  • योग्य लोकेशन आणि चांगली कनेक्टिव्हिटी असलेले घर निवडा.
  • कायदेशीर कागदपत्रे, RERA नोंदणी आणि परवानग्या तपासा.
  • आपल्या बजेटनुसार दीर्घकालीन परतफेडीची सोय असलेले घर निवडणे उत्तम.

घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. नवरात्रीत घर खरेदी करून आपण केवळ वास्तूच नाही तर देवीचा आशीर्वाद, सकारात्मकता आणि समृद्धी आपल्या जीवनात आणतो. म्हणूनच आता विलंब नका करू ! या नवरात्रीत आदिशक्तीच्या आशीर्वादासह आपल्या स्वप्नातील घराच्या प्रवासाची सुरुवात करा.

शिरूरमधील ग्राहकांचे विश्वासू ब्रँड असलेले बीजे कन्स्ट्रक्शन्सचा ‘१ सदाबाग’ हा निसर्गाच्या कुशीत, आधुनिक सोयींनी सजलेला आलिशान गृहनिर्माण प्रकल्प आहे. या शुभ मुहूर्तावर आजच बुकिंग करा आणि समृद्धीचं नवं दार उघडा !

Share: