‘अक्षय्य तृतीया’च्या दिवशी ज्या गोष्टींचा शुभारंभ केल्या जातो त्याला अक्षय फळ मिळतं, असं आपल्या संस्कृतीत मानलं जातं. त्यामुळेच अनेकजण या दिवशी सोनं, वाहन, किंवा घरासारख्या मौल्यवान गोष्टींची खरेदी करत असतात. घर म्हणजे केवळ भिंती नसतात ते असतं तुमचं स्वप्न, तुमचं भविष्य आणि तुमच्या कुटुंबाचं सुरक्षित आधारस्थान असतं. अक्षय्य तृतीयेला घर खरेदी केल्यास तुमच्या जीवनात अक्षय सुख-समृद्धी येत असते, म्हणून जर तुम्हीही तुमचं स्वतःचं घर घेण्याचा विचार करत असाल, तर या शुभमुहूर्तावर तुमच्या जवळच्या लोकेशनवर तुमच्या मनातील घर बुक करण्यासाठी शिरूर मधील बी. जे कन्स्ट्रक्शन्सचा ‘१ सदाबाग’ हा गृहनिर्माण प्रकल्प तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

शिरूर, पुणे जिल्ह्यातील एक वेगाने विकसित होणारं उपनगर आहे, जे घर खरेदीसाठी ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. पुणे शहरापासून काही अंतरावर असलेलं हे ठिकाण, शांत वातावरण, उत्तम कनेक्टिव्हिटी आणि भविष्यातील उत्तम गुंतवणूक या सर्व गोष्टींसाठी ओळखलं जात आहे. आता याच शहरात रामलिंग रोडवरील ‘१ सदाबाग’ या गृहनिर्माण प्रकल्पामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी एक आलिशान, आरामदायक आणि आधुनिक घर निवडू शकता. येथून जवळच छत्रपती संभाजीनगर-पुणे राष्ट्रीय महामार्ग, औद्योगिक वसाहती, हॉस्पिटल्स आणि मार्केट्सची उपलब्धता असल्याने परवडणाऱ्या किंमतीत या ठिकाणी उत्तम गुंतवणूक करता येते.

४.५ एकरमध्ये पसरलेला ‘१ सदाबाग’ एक विशाल गृहप्रकल्प आहे. जेथे तुम्हाला प्रशस्त २ बीएचके रो-हाऊसेस, ३ बीएचके आलिशान स्वतंत्र बंगलो, ३ बीएचके ट्वीन बंगलो मिळतील. आणि तुमच्या मनासारखं घर बांधण्यासाठी एन ए प्लॉट्ससुद्धा उपलब्ध आहेत. येथे प्रत्येक घर आधुनिक सुविधांनी सुसज्ज असल्याने उच्च दर्जाचे बांधकाम साहित्य आणि आकर्षक इंटिरियर्स यामुळे मानसिक समाधान मिळतं. सोबतच या ठिकाणी तुम्हाला पंधराहुन अधिक सोयी-सुविधा सुद्धा मिळत आहे.

आपण ज्या ठिकाणी घर घेतो तेथे स्थान आणि सुविधा खूप महत्वाच्या असतात. कारण आज प्रत्येकजण सुसह्य जगण्याला प्राध्यान्य देतो. त्यामुळे प्रमुख ठिकाणांशी उत्तम कनेक्टिव्हिटी असायला हव्यात. याठिकाणी तुम्हाला शाळा, कॉलेजेस, मॉल्स, हॉस्पिटल्स आणि बाजारपेठेतील सर्व सुविधा इथून काही मिनिटांच्या अंतरावर आहेत. ज्याच्या उत्तम फायदा होतो.

विश्वासार्हता आणि गुणवत्ता असलेल्या या गृहप्रकल्पामध्ये प्रशस्त रूम्स, सुंदर बेडरूम्स आणि मोठे हॉल्स असलेले रो-हाउसेस, आणि बंगलो आहेत. येथे तुम्ही निवडलेल्या घरात भरपूर सूर्यप्रकाश, मोकळी हवा आहे ज्यामुळे तुम्हाला निसर्गाचा आनंद घेता येईल. आधुनिक वास्तुकलेचा वापर केल्याने एक स्टाइलिश लूक बघायला मिळतो. घराच्या सजावटीमध्ये सौंदर्यपूर्ण दृष्टीकोनाचा समावेश देखील करण्यात आलेला आहे.

जर तुम्हीही तुमचं स्वतःचं घर घेण्याच्या विचारात असाल, तर याहून चांगला मुहूर्त नाही. ही सुवर्णसंधी हातची जाऊ न देता येणाऱ्या अक्षय्य तृतीयेला १ सदाबाग या प्रकल्पाला भेट द्या आणि तुम्ही स्वप्न पाहत असलेले घर घ्या !

Share: