दीपावली, साडेतीन मुहूर्ताचा वलय असलेला, कोणत्याही नवीन कार्यासाठी उत्तम दिनाचे माहात्म्य घेऊन येणारा सण. लक्ष्मीच्या आगमनाने घरात सुख-शांती, समाधान आणि भरभराट नांदत असते. दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेली प्रत्येक दिशा, घराघरांतून दुमदुमणारा आनंद, आणि नात्यांमधील गोडवा ही एक पर्वणीच असते. या काळात नवीन वस्तू खरेदी करणे किंवा नव्या घरात प्रवेश करणे अत्यंत शुभ मानले जाते.

दीपावली हा सण आनंदाचा, समृद्धीचा आणि नव्या सुरुवातीचा शुभमुहूर्त घेऊन येतो. या उत्सवी वातावरणात आपल्या कुटुंबासाठी स्वतःचे घर घेण्याची अनेकांची इच्छा असते. त्या स्वप्नांना वास्तवात उतरवण्यासाठी शिरूर येथील ‘बीजे कन्स्ट्रक्शन्स’ घेऊन आले आहेत शिरूरच्या मध्यभागी वसलेला आपला खास प्रकल्प ‘१ सदाबाग’.

इथे तुम्हाला मिळणार आहे आधुनिक जीवनशैलीची अनुभूती, दर्जेदार सोयीसुविधा आणि शांततेच्या कुशीत असलेले तुमचे स्वतःचे स्वप्नवत घर.

रामलिंग रोडवर असलेला ‘१ सदाबाग’ या प्रकल्पात आधुनिक जीवनशैलीचा अनुभव देणारे खास वैशिष्टये आहेत. आकर्षक व सुबक वास्तुशास्त्रानुसार डिझाईन, प्रशस्त खोल्या आणि नैसर्गिक जीवनमान, २४ तास सुरक्षा व CCTV देखरेख, चालण्यासाठी ट्रॅक, आणि मुलांसाठी खेळण्याची जागा, यासह पंधराहून अधीक दर्जेदार अमेनिटीज आहे.

शिरूर, वाढत्या संधीचं केंद्रस्थान

शिरूर हे पुणे आणि अहिल्यानगर दरम्यान झपाट्याने विकसित होणारं शहर आहे. पुणे–नगर महामार्गामुळे येथे उत्तम कनेक्टिव्हिटी असून, इंडस्ट्रियल हब, शिक्षणसंस्था आणि व्यवसायिक संधींमुळे शिरूर आज “भविष्याचा स्मार्ट लोकेशन” म्हणून ओळखले जाते.

शिरूरमध्ये घर घेण्याची काय कारणं आहेत ?

  1. पुण्याच्या जवळ असूनही परवडणारी मालमत्ता
  2. उत्तम रस्ते व वाहतूक सुविधा
  3. शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स आणि मार्केट्सची उपलब्धता
  4. वाढता रोजगार व औद्योगिक विकास

१७ वर्षाच्या अनुभवासह बीजे कन्स्ट्रक्शन्सने नेहमीच गुणवत्तेला आणि ग्राहकांच्या विश्वासाला प्राधान्य दिले आहे. ‘१ सदाबाग’ हे याच परंपरेचं पुढचं पाऊल आहे, जेथे प्रत्येक ग्राहकांला आपले मनासारखे घर मिळणार आहे.

या दीपावलीच्या शुभमुहूर्तावर स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी हातातून जाऊ देऊ नका ! आजच ‘१ सदाबाग’ मध्ये आपले स्वप्नवत घर बुक करा. आणि यंदाची दिवाळी, आपल्या स्वतःच्या घरात उजळू द्या !

शुभ दीपावली !

Share: